पर्यावरण पूरक गणपती साकारणाऱ्या हातांचा सन्मान!

jay-ganesh-vyaspeeth

पुणे (पीयूष शाह): जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जय गणेश व्यासपीठ मधील आठ मंडळांनी पुढाकार घेत पर्यावरण पूरक गणपती साकारणाऱ्या हातांचा सन्मान केला आहे. माती, कागद, शेत माती, गोमाता चे शेण याच्या पासून मूर्तिकारांनी विविध आकाराचे सुंदर, सुबक असे श्री गजाननाचे स्वरूप साकारले होते. महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या मूर्तिकार यांना उपरणे, पुस्तके व पुणेरी खाऊ देत सन्मान करण्यात आला.

उपक्रमात जय गणेश व्यासपीठ मधील साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियूष शाह, गंधाली शाह, वीर शिवराज मित्र मंडळाचे किरण सोनीवाल, श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हादभाऊ थोरात, एकता मित्र मंडळाचे सुधीर ढमाले, विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, नवजवान मित्र मंडळाचे स्वप्नील मालेगावकर, शिवराज मित्र मंडळाचे प्रशांत खंडागळे, नवज्योत मित्र मंडळाचे अमित जाधव, अक्षय रजपुत अशा आठ मंडळांचा कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

दरम्यान, पुनरावर्तन समूहचे मनीषा शेठ, मयूरी कुंभार, शमा देव, मैत्रेय घोरपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुणे गपणती प्रोजेक्टला मदत करण्यासाठी QR कोड स्कॅन करा…

प्रतिक्रिया 0

No comments yet.