पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

aamche-mandal

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील www.puneganpati.comच्या वतीने गणपती मंडळांच्या अध्यक्षांच्या अनुभवावर आधारीत ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ हे पुस्तक तयार केले जाणार आहे. पुणे शहरातील गणपती मंडळांच्या अध्यक्षांचे हे पहिलेच पुस्तक असणार आहे. वेबसाईट, ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ आणि ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ या पुस्तकाचा एकत्रित प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात केला जाणार आहे.

पुणे शहरातील गणपती उत्सवामध्ये विविध गणपती मंडळांच्या अध्यक्षांचा मोठा वाटा राहिला आहे. गणपती मंडळांनी केलेल्या विकासामुळे सामाजिक, धार्मिक क्षेत्रात मोठा बदल होताना दिसत आहे. पुणे शहरातील गणपती मंडळाच्या अध्यक्षांचे विविध अनुभव ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ या पुस्तकामध्ये घेतले जाणार आहेत. विविध अध्यक्षांचे अनुभव कार्यकर्त्यांना अथवा भावी अध्यक्षांना दिशा देणारे ठरणार आहेत. शिवाय, पुस्तकातील माहिती www.puneganpati.com या वेबसाईटवरही घेतली जाणार असून, जगभर जाणार आहे.

दरम्यान, पुणे शहरातील www.puneganpati.com ही पहिलीच गणपती मंडळांची माहिती देणारी वेबसाईट ठरणार असून ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ हे पुस्तकही पहिलेच ठरणार आहे. सशुल्क असणारे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरेल आणि संग्राह्य राहणारे ठरणार आहे. संबंधित पुस्तकामध्ये मंडळाचा फोटो, अध्यक्षांचे छायाचित्र, मंडळाविषयी माहिती अथवा विविध दैनिकांमध्ये आलेल्या बातम्यांची कात्रणे दिली जाणार आहेत. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना पुस्तकातील स्वतंत्र १० पाने दिली जाणार. दहा पानांमध्ये मंडळ अथवा अध्यक्षांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ या पुस्तकाचे वैशिष्ट्ये…
१) पुणे शहरातील गणपती मंडळांचे पहिले पुस्तक ठरणार.
२) प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचे स्वतंत्र पुस्तक असणार.
३) पुस्तकातील माहिती www.puneganpati.com वेबसाईटवर राहणार.
४) सोशल मीडियावरून माहिती व्हायरल होणार
५) पुस्तकाची ISBN No. सह ऐतिहासीक नोंद होणार
६) पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार

अधिक माहितीसाठी संपर्क:
WhatsApp: 93712 69949
EMail: puneganpatidairy@gmail.com

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

भाविकांना अष्टविनायक दर्शनासाठी वाहनांची सुविधा…

प्रतिक्रिया 0

No comments yet.