साईनाथ मंडळ ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम; 300 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण…

nmv-pune

पुणे (पियूष शहा) : राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील 300 विद्यार्थ्यांना शनिवारी (ता. १९) आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित अग्निशमन विभागातर्फे विविध उपक्रब राबविण्यात येत आहेत. आग कशामुळे लागू शकते, आपत्‌कालिन परिस्थिती उद्‌भवल्यास काय-काय उपाययोजना कराव्यात या विषयी कसबा अग्निशमन केंद्रातील प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन वाहनात असलेल्या विविध उपकरणांची माहितीही देण्यात आली तसेच या उपकरणांचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आग आटोक्यात आणण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी आणि शिक्षकांकडून करून घेण्यात आले. अग्निशमन वाहनामधील अधिकारी कमलेश चौधरी, चालक किरण शिंदे, फायरमन अब्दुल पटेल, हरीश बुंदेले, ज्ञानेश्वर गायकवाड व आतिश नाईकनवरे यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे अध्यक्ष पियूष शहा यांनी केले. डी. बी. देवरुखकर यांचा सौजन्याने पियूष शहा व शिक्षकांच्या हस्ते अग्निशमन दलातील जवानांना मानचिन्ह व उपरणे स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पियूष शहा यांनी प्रास्ताविकात अग्निशामन दलातील जवानांच्या कार्याविषयी माहिती देत आभार मानले. उपक्रमास शाला समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर याचे सहकार्य लाभले.

महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, उपप्राचार्या राजश्री हेंद्रे, उषा जांभळे, भारती कपटकर, माधुरी भामरे, बाजीराव शेरमाळे, विद्या चाकणकर आदी उपस्थित होते.

पर्यावरण पूरक गणपती साकारणाऱ्या हातांचा सन्मान!

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे गपणती प्रोजेक्टला मदत करण्यासाठी QR कोड स्कॅन करा…

प्रतिक्रिया 0

No comments yet.