About us

pune-ganpati-dairy-2025-26

जय गणेश,
महाराष्ट्रासह जगभर गणेशोत्सव उत्साहात साजरा केलाच जातो. पण, पुणे शहरातील गणेशोत्सवाला एक परंपरा आहे. एक म्हणजे मानाच्या पाच गणपतींची परंपरा. 1893 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला. यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. आजही मानाच्या पाच गणपतींची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते.

1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गणपती मंडळांची संख्या वाढत गेली. असं सांगितलं जातं की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या 100 वर गेली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रुपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरु झाली. ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला मानाचा पहिला गणपती हा मान देण्यात आला. या मंडळाच्या सार्वजनिक गणपतीला विसर्जनाचा पहिला मान देण्याचे लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले. आजही कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीत पहिला असतो. पुण्यात मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात महात्मा फुले मंडईमधून होते. नंतर ती लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाते. मुठा नदीच्या पात्रात गणपती विसर्जन होते. पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण शहरामध्ये हजारो गणपती मंडळं आहेत.

गणेश मंडळं गणेशोत्सवाशिवाय वर्षेभर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असतात. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला जोडण्याचे काम ते करत असतात. पुणे शहरातील गणपती मंडळांची संपूर्ण माहिती देणारी www.puneganpati.com ही वेबसाईट आणि ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ तयार करण्यात आली आहे. वेबसाईटवर गणपती मंडळांची माहिती, फोटो, व्हिडिओ, बातम्या, लेख देत राहणार आहोत. यामुळे पुणे शहरातील गणपती मंडळांचे देखावे, सामाजिक उपक्रम जगभर पोहचणार आहे. शिवाय, प्रथमच ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ तयार करण्यात आली असून, यामध्ये तीन हजारहून अधिक गणपती मंडळांची एकत्रित माहिती देण्यात आली आहे. गणपती मंडळांसह जगभरातील भाविकांना याचा उपयोग होईल, ही अपेक्षा!
धन्यवाद!

संतोष धायबर,
संपादक, 93712 69949
santosh.dhaybar@gmail.com