एकता मित्र मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीला गोसेवा अन्नदान!

ekta-mitra-mandal

पुणेः गोसेवा-परमो धर्म याची जाण ठेवत एकता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून हिंदू संस्कृती व सामाजिक भान जोपासत संकष्टी चतुर्थीला गोसेवा अन्नदान करण्यात आले.

संकष्टी चतुर्थीचे (ता. १६) औचित्य साधत आपल्या पर्वती भागामध्ये सर्वात पहिली कार्यरत असणारी समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचलित गोकुळ धाम गोशाला, सारसबाग, पुणे येथे एकता मित्र मंडळाच्या वतीने दर चतुर्थीला अन्नदान सेवा कार्याचा एक भाग म्हणून यावेळी मंडळाचे उत्सव प्रमुख हिरेन गायकवाड यांच्या संकल्पनेतून व जयेश ढमाले, गणेश खाडे, आशुतोष अमराळे, संकेत मिरगे, केशव अमराळे, शुभम खाडे, साई भोसले, हेरंब ढमाले, श्लोक कोंडे, शुभम बाणखेले, अथर्व तिवाटणे, सुशांत सुभेदार, चैतन्य ढमाले, गौरव शिर्के, दुर्वांकुर ढमाले, आदित्य मिरगे, मानव बाणखेले व अध्यक्ष सुधीर ढमाले या सर्वांच्या माध्यमातून २०० किलो कडबा-कुट्टी गोसेवेत उपलब्ध करून देण्यात आली.

गायीची सेवा – परम धर्म (सर्वोच्च धर्म) आपल्या संस्कृतीत गाईला विशेष स्थान आहे. त्यांची सेवा केल्याने केवळ पुण्य मिळत नाही तर पर्यावरणालाही फायदा होतो. गायीचे दूध, शेण आणि गोमूत्र आपल्या जीवनात पवित्रता आणि समृद्धी आणतात. चला, आपण सर्वजण गोसेवेचा स्वीकार करूया आणि जीवनात थोडे का होईना पुण्य कमवूया, असा सामाजिक संदेश देण्यात आला.

एकता मित्र मंडळाच्या वतीने मुलांना खेळांची मेजवानी !

एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)

अरण्येश्वर एकता मित्र मंडळाने सुरू केला पक्षांची तहान भागवण्याचा जागरूक उपक्रम…

प्रतिक्रिया 0

No comments yet.