अरण्येश्वर एकता मित्र मंडळाने सुरू केला पक्षांची तहान भागवण्याचा जागरूक उपक्रम…

ekta-mitra-mandal-bird

पुणे (सुधीर ढमाले): पक्षांनाही लागते तहान… आपण सर्वांनी राखले पाहिजे सामाजिक भान…! अरण्येश्वर एकता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पक्षी प्रेम व्यक्त करणारा आणि त्यांना सुसह्य जीवन जगण्यासाठी “पाणी भांडे व निवारा मिळण्यासाठी झाडांवर घरटी बांधण्याचा जागरूक उपक्रम सुरू केला आहे. मंडळाने केलेल्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे वाटीभर पाण्याची. आज हेच सामाजिक भान राखून रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी अरण्येश्वर एकता मित्र मंडळातील जागरूक कार्यकर्ते जयेश ढमाले, शुभम खाडे, अथर्व तिवाटणे, आदित्य मिरघे, हर्षद खंडागळे, हेरंब ढमाले, सार्थक दसवडकर, शुभम वाईकर व अध्यक्ष सुधीर ढमाले यांनी मंडळाच्या आजूबाजूच्या अनेक ठिकाणी कडक उन्हाळ्यात पक्षांचा योग्य तो बचाव होण्यासाठी व त्यांना सुसह्य जीवन जगण्यासाठी “पाणी भांडे व त्यांना निवारा मिळण्यासाठी झाडांवर घरटी बांधण्यात आली.

वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत असतात. मात्र, याचे पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत असतात. दर वर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारा व्यक्त करत अनेकवेळा करीत आहेत.

तुम्ही पक्ष्यांसाठी काय कराल ?
✓ घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवावीत.
✓ ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे.
✓ या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.
✓ घराच्या खिडकीत, गॅलरीत, बागेमध्ये, सोसायटीच्या भिंतींवर कोपऱ्यांत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल.
✓ शक्यतो स्टीलचे भांडे ठेवणे टाळा, कारण ते पटकन गरम होतं आणि पाणीही तापतं.
✓ नर्सरीमध्ये अलीकडे मातीची पसरट भांडी मिळतात. पक्ष्यांना पाणी पिणे सोयीस्कर ठरते. ही मातीची भांडी शक्यतो सावलीत ठेवावीत.

एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

प्रतिक्रिया 0

No comments yet.