श्री पोटसुळ्या मारुती मंडळाकडून पीडित महिलांच्या मदतीसाठी पुढाकार…

potsulya-maruti-mandal

मोशी येथील ‘चैतन्य महिला मंडळा’ला धान्य मदत व संचालिकांचा सन्मान

पुणे: सामाजिक बांधिलकी जपत गणेश पेठेतील श्री पोटसुळ्या मारुती मंडळाच्या वतीने मोशी येथील ‘चैतन्य महिला मंडळ’ या संस्थेला जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका ज्योती पठाणिया आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

मोशी येथे कार्यरत असलेले ‘चैतन्य महिला मंडळ’ हे सध्या ३० ते ३५ पीडित महिलांचे हक्काचे निवासस्थान आहे. ही संस्था केवळ या महिलांना आश्रयच देत नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि स्वावलंबनाचे धडेही देते. त्यांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी श्री पोटसुळ्या मारुती मंडळाने पुढाकार घेतला.

या उपक्रमांतर्गत संस्थेला गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे, पोहे आणि डाळ यांसारखे दैनंदिन वापराचे धान्य आणि साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला ‘जय गणेश व्यासपीठ’चे समन्वयक पीयुष शाह, तसेच श्री पोटसुळ्या मारुती मंडळाचे रितेश सुंबे, वैभव काणेकर, ओंकार जाधव आणि कुणाल पवार उपस्थित होते. संकटकाळात महिलांना आधार देणाऱ्या संस्थांना समाजातील अशा मंडळांनी साथ दिल्यास त्यांचे कार्य अधिक विस्तारण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

Pune Ganpati : मानाच्या 5 गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ जाहीर…

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

प्रतिक्रिया 0

No comments yet.