पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत झाला मोठा निर्णय…

Pune-Ganpati-Cover

पुणे: पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला आहे. शहरातील मानाच्या पाच गणेश मंडळांच्या अगोदरच सकाळी सात वाजता मिरवणुका काढण्याचा काही गणपती मंडळांचा आग्रह होता. यामुळेच वाद निर्माण झाला होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मध्यस्थीने आता गणपती मिरवणूक वादावर तोडगा काढण्यात आला आहे. आता पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

गणपती विसर्जन मिरवणुका वादावर तोडगा काढण्यासाठी सर्किट हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठिकला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांच्यासह मानाचे गणपती आणि इतर गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत चर्चेनंतर सकाळी 9.30 वाजता विसर्जन मिरवणुका सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी मंडळांना काही नियम लागू करण्यात आले आहेत. मंडळांच्या गणपतीसमोर ढोलपथकांचे स्थिर वादन होणार नाही, मंडळ एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबणार नाही आणि दोन गणेश मंडळांमध्ये व्यवस्थित अंतर राखले जाईल. विद्युत रोषणाई असलेल्या मंडळांना संध्याकाळी मार्ग मिळेल, असे महत्वपूर्ण निर्णय या गणेश मंडळांच्या बैठकीत घेण्यात आले.

प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आणि मंडळांच्या समन्वयातून यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि कोणतेही गालबोट न लागता पार पडेल असा विश्वास मंडळाच्या कार्यकर्त्यांना व्यक्त केला. मंडळांचा वाद मिटल्यामुळे भव्य आणि पारंपारिक विसर्जन मिरवणुका पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत.

पुणे मेट्रोने गणेशोत्सवात नागरिकांसाठी घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरातील मानाच्या गणपतींना पहिलं विसर्जन करण्याचा मान मिळणार का?

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळेत होणार बदल? एकच ढोलपथक…

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय…

गणेश चतुर्थी यंदा कोणत्या तारखेला साजरी होईल? घ्या जाणून..

विधानसभेत मोठी घोषणा! गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव; यंदा देखावा…

पुणे गणपती मंडळांच्या देणगीबाबत पुनीत बालन यांचा मोठा निर्णय…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

प्रतिक्रिया 0

No comments yet.