नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, पुणे

Neharu-Tarun-Mandal

मंडळाचे नाव : नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट
मंडळाची स्थापना : १९३९
पत्ता : नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट, ७३९ बुधवार पेठ, गणेश रोड, पुणे – ४११ ००२.
संपर्क : अविनाश नारायण वाडकर
अध्यक्ष : अशोक संताजी मोडक
पदाधिकाऱ्यांची नावे :

  • नितीन धर्मराज राऊत
  • शेखर प्रभाकर बेहेरे
  • सुरज सतीश क्षिरसागर
  • पुष्कर रामचंद्र तुळजापूरकर
  • निलेश रामचंद्र राऊत

नेहरू तरुण मंडळाची स्थापना १९३९ मध्ये कै. मुरलीधर गाढवे, स्वातंत्र्यसैनिक कै. भाऊसाहेब वाडकर, कै. अप्पासाहेब नवले, कै. शांताराम नगरकर, कै. यशवंत शाळिग्राम ई. यांच्या हस्ते झाली. मंडळाची ‘महोत्कट गणेश’ रुपी श्रीं ची मूर्ती श्री. सरदेशमुख आणि श्री. चिंतामणी जवारी यांनी घडविली असून मूर्तीच्या पोटामध्ये सिद्ध गणेश यंत्र बसविण्यात आले आहे.

मंडळाच्या वतीने अनेक सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा विषयक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले आहे ज्यामध्ये रक्तदान, मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या तपासण्या आणि मोफत चष्मे वाटप व औषध वाटप केले गेले आहे. मंडळातर्फे हेल्मेट सक्ती व पुण्यातील रस्त्यांच्या खड्डयांविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. मंडळातर्फे स्वातंत्र्य सैनिकांचा आणि भारतीय जवानांच्या वीर मातांचा सत्कार व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला होता. मंडळाच्या नेहरू क्रिकेट क्लब या संघाने अनेक वर्षे क्रिकेट मध्ये विविध पारितोषिके जिंकली आहेत तसेच मंडळाने सुद्धा अनेक क्रिकेट चे सामने आयोजित केले आहेत. मंडळाला विघ्नहर्ता न्यास, पुणे फेस्टिवल, बाप्पा माझा अशी अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

मंडळातर्फे अनाथ व गरजू मुलांना औषध वाटप, धान्य वाटप त्याचप्रमाणे शैक्षणिक मदत केली गेली आहे तसेच पूरग्रस्त भागातील नागरीकांना अन्न आणि धान्य वाटप केले आहे. कोरोना काळात मंडळातर्फे मोफत लसीकरण शिबिरातून १२०० नागरिकांचे मोफत लसीकरण केले गेले तसेच गरजू संस्थांना व लोकांना धान्य वाटप करण्यात आले होते.

मंडळ यंदा ८६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २०२३ साली श्रींची प्राणप्रतिष्ठा तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांच्या हस्ते करण्यात आली होती, एका तृतीयपंथी व्यक्तीच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना होती. मंडळातर्फे दरवर्षी गणेश जन्म, शिवजयंती उत्सव, शाही दसरा उत्सव आयोजित केले जातात. मंडळास गायिका लता मंगेशकर, मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती, आध्यात्मिक गुरू श्री सुनीलजी काळे, श्री. सुधांशु जी महाराज, चंद्रशेखरजी बावनकुळे, एव्हरेस्ट वीर उमेश झिरपे यांसारखे अनेक प्रतिष्ठित लोकांनी भेट दिली आहे. दरवर्षीची परंपरा जपत यंदाच्या वर्षीही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उत्सवासाठी उत्सव मंडपात १ लक्ष एल.ई.डी दिव्यांचा नयनरम्य असे मंदिर साकारले आहे आणि विसर्जन सोहळ्यासाठी २ लक्ष एल.ई.डी दिव्यांचा नयनरम्य असा रथ साकारला आहे.

मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक मोडक, कार्याध्यक्ष श्री. अविनाश वाडकर, सेक्रेटरी श्री. नितीन राऊत, खजिनदार श्री. शेखर बेहेरे, उत्सवप्रमुख श्री. पुष्कर तुळजापूरकर व कार्यकारी अध्यक्ष श्री. ओंकार पाडळकर आणि श्री. ओंकार वाडकर, श्री कपिल राऊत, श्री. ऋषिकेश राऊत, श्री. राज नाईक, श्री. अनिकेत जगताप, श्री. निलेश राऊत, श्री. सूरज क्षीरसागर, श्री. मेघनाथ नवले, ई. सध्या श्रींच्या उत्सवाची धुरा सांभाळत आहेत.
– अविनाश वाडकर, कार्याध्यक्ष

मंडळाची महत्त्वाची कामे :

  • सामाजिक, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धा (क्रिकेट)
  • महिला मंडळातर्फे ६ बचत गट स्थापन
  • स्वरूप वर्धिनी समवेत लहान मुलांचे कथा वाचन स्पर्धा
  • बचत गटातर्फे देवदासी, मुलांसाठी स्पर्धा

Facebook : https://www.facebook.com/Mahotkatganesh
Email: nehrutarunmandaltrust1939@gmail.com

Neharu-Tarun-Mandal-Trust

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

प्रतिक्रिया 0

No comments yet.