वज्रदेही मंडळ ट्रस्ट

Vajradehi-Ganpati-Mandal

मंडळाचे नावः वज्रदेही मंडळ ट्रस्ट
पत्ता : ७६९, रविवार पेठ, वज्रदेही चौक, फडके हौद, पुणे – ४११ ००२.
मंडळाची स्थापना : १९३८

वज्रदेही मंडळाची वाटचाल…

मंडळाच्या पूर्व इतिहास…
वज्रदेही मंडळ रविवार फडके हौद चौकातील मंडळ आहे. मंडळाची स्थापना सन १९३८ झाली. सदर मंडळ स्थापन होण्याअगोदर पूर्वीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी हयाची स्थापना केली. त्यावेळेस मा. कै. दादा मेमाणे त्यांचे बंधू अनंतराव मेमाणे, तसेच दत्ता नगरकर, सावंत बंधू, रामसिंग परदेशी, अप्पा नवले यांनी हे मंडळ स्थापन केले. परंतु, या चौकात ‘जुने टांगास्टॅण्ड व जुनं मारुती मंदीर होते.’ सदरच्या त्या वेळच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न करुन मंडळ उभारले.

सदरच्या जागेत कै. दादा मेमाणे यांचे सायकल दुकान जुन्या जागेत होते. त्यावेळेस कसब्यातील अग्रवाल तालीम मध्ये हे सर्व पहिलवानगिरी व्यायाम करत असत. तदनंतर त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी वज्रदेही मेळा स्थापन केला. त्यावेळेस सदर कार्यकर्त्यांना गणपतीची आवड असल्यामुळे सन १९३८ साली श्री गणेशाची पैहलवान स्वरुपाची मूर्तीची स्थापन केली व तेथून पुढे ‘वज्रदेही’ हे नाव आरुढ झाले.

तेथून पुढचा इतिहास…
त्या वेळच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनीक गणेशोत्सवात १० दिवस मेळा, लोकनाटय, शास्त्रीय गायन येथे ते कलाकार कार्यक्रम करण्यास अतिउत्सुक असत. त्यानुसार या मंडळात गणेशउत्सवात १० दिवस कार्यक्रम होते. येथे विठाभाऊ नारायणगावकर, दत्तोबा तांबे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांनी लोकनाट्य सादर करुन नाव मिळवले.

शास्त्रीय गायनास, सरस्वती राणे, रामदास कामत, गंगुबाई हतगळ, सुलोचणा चव्हाण चंद्रशेखर गाडगीळ यांनी स॒ध्दा हजेरी लावलेली आहे. परंतु हा उत्सव करण्यास १) दत्तोबा पडावकर, २) बुवा जाळींद्रे, ३) जनाभाऊ जगताप व त्यांचे सहकारी मित्र व सावंत बंधू यांनी बहुमोल मदत केली व मंडळाचे नाव नवारुपास आणले. त्यावेळेस पुण्यात फक्त वज्रदेही मंडळास हे कार्यकम आवर्जुन ऐकण्यास जनता जनार्दन हजर असत.

अशा प्रकारे हे मंडळ नावारुपाला आले. त्याच वेळेस जुन्या काही लोकांना देवाज्ञा झाल्या तसेच मध्यंतरीच्या काळात काही कार्यक्रम न होता नेहमी पूजाअर्चा करुन १० टिवसाचा उत्सव साजरा केला जाई. जसजसे वर्षे निघून जात होते. तसे मंडळात नवनविन सभासद झाले व त्यांची हातभार लावून व नविन सभासदांनी मंडळा नावारुपाला आणण्यासाठी प्रयत्न केले. सन १९६० नंतर नवीन सभासद जोमाने कार्यास तयार झाले. प्रथमत: रस्त्यातील मंदीर काढून ७६९ रविवार येथील मोकळया जागेत त्याची विधीपूर्वक स्थापना केली. परंतु नवीन व जुन्या सभासदांनी नवीन मंदीर बांधकाम आर्थिक भरघोस करुन मंदिर बांधले. त्या कार्यात १) सिताराम उर्फ बापूसाहेब चव्हाण, विजू शेठ पारेख, २) प्रशांत बेंद्रे, ३) श्री. घारेभाऊ, ४) राजू पाटील, ५) श्रीरंग पवार यांनी अपार कष्ट करुन वर्गणी गोळा करुन मंदिर उभारण्यास हातभार लावला. सदरचा मंदिर उभारणीस ११ वर्षांचा काळ लागला.

नवीन सभासदांनी गणेश जन्म, शनी जयंती, वारकरी भोजन सुरू केल्या. तसेच देवळाचा सुधारणा करुन देवूळ ग्रीलने बंदिस्त केले. तसेच सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवून घेतला आहे. सध्या पेटीद्वारे व मदतीद्वारे सदरचे कार्यक्रम राबवत आहेत. सध्या या मंडळाची देखभाल खालील सभासद करीत आहेत.
१) विश्‍वस्त – विजु शेठ पारेख, बापूसाहेब चव्हाण
२) अध्यक्ष – प्रशांत बेंद्रे
३) कार्यध्यक्ष – श्रीरंग पवार
४) खजीनदार – राजेंद्र पाटील
५) उप कार्याध्यक्ष – धर्मेंद्र महाराज
६) हिशेब तपासणीस – श्री. घारेभाऊ तसेच अनेक मित्र परिवार हे काम करत असून मंडळाचे नाव हे नावारुपाला आणले आहे. नवीन सभासद सदर कार्यक्रम एकोप्याने दरवर्षी सादर करीत आहे. मंडळाचे सर्व व्यवहार बॅंके मार्फत केले जातात व सनदी लेखापाल कडून ऑडीट करुन घेतले जातात. तसेच संस्था पुढीलप्रमाणे रजिस्टर केली आहे.
१) वज्रदेही मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव – ट्रस्ट नंबर – एफ. २४६५८
२) वज्रदेही मारुती नवग्रह मंदिर ट्रस्ट – ट्रस्ट नंबर – ए २७४९/पुणे

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

प्रतिक्रिया 0

No comments yet.