POP गणेशमूर्तीवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली, एक अट कायम…

pop-ganpati

मुंबई: प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) गणेशमूर्ती बनविणे आणि विक्री करण्यावर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने उठविली आहे. त्यामुळे गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील गणेशमूर्तीकारांना दिलासा दिला आहे. मात्र, न्यायालयाने मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्ये करण्याची अट कायम ठेवली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने उच्च न्यायालयाला माहिती दिली की, पीओपी मूर्तींवर बंदी घालणारी त्यांची 2020 ची मार्गदर्शक तत्त्वे केवळ विसर्जनपुरती मर्यादित आहेत. त्यामुळे मूर्ती बनविण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. सीपीसीबीने सादर केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, मार्गदर्शक तत्त्वे ही केवळ सल्लागार स्वरुपाची आहेत. पीओपी मूर्तींना यापुढे राज्यात परवानगी द्यायची की नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल.

पीओपी मूर्ती विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, यावर महाराष्ट्र सरकार तर्कशुद्ध निर्णय घेईल, सीपीसीबीचे प्रतिज्ञापत्र विचारात घेतल्यानंतर मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने म्हटले. सीपीसीबीच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. असोसिएशनच्या कारागिराला किंवा कोणत्याही कारागिराला पीओपी मूर्ती बनविण्याची परवानगी आहे, हे सांगण्याची मात्र आवश्यकता नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये पीओपींच्या मूर्तींचे विसर्जन करू नका, असेही यावेळी न्यायालयाने स्पष्ट बजावले आहे.

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.