भारत-पाक तणाव! सिद्धिविनायक प्रशासनाचा मोठा निर्णय…

siddhivinayak-mumbai

मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून महाराष्ट्रासह देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत देखील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिद्धीविनायत मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आता मंदिरात हार-नारळ अर्पण करता येणार नाही.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता सिद्धिविनायक मंदिरात हार-नारळ अर्पण करता येणार नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाकडून हा नर्णय घेण्यात घेण्यात आला आहे.

मंदिर भाविकांसाठी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दर्शासाठी खुले…
सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दर्शासाठी खुले असते. आरती आणि नैवद्याची वेळ वगळता दिवसभर मंदिर हे भाविकांसाठी खुले असते. दहशतवादी संघटनांकडून याआधी अगोदर देखील मंदिराला टार्गेट करण्यात आले आहे. मुंबईत प्रसिद्ध ठिकाणे किंवा गर्दीची ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली जाते. मुंबईत अनेकदा बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्लेही घडविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. मुंबई पोलीसही सर्वत्र तैनात असून सुरक्षा यंत्रणा नेहमीच अलर्ट असते.

सिद्धिविनायक मंदिर म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान…
मुंबईतले सिद्धिविनायक मंदिर म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. दररोज येथे शेकडो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. मुंबईसह देशातील अनेकांचे श्रद्धेचे स्थान आहे. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसह, उद्योजक मुकेश अंबानीही या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिराचे वेगळेच महत्त्व आहे.

अष्टविनायकसह 5 मंदिरात वस्त्रसंहिता, दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे, नियमावली जारी…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

घरात देवाला नैवेद्य अर्पण करतानाचे नियम…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

प्रतिक्रिया 0

No comments yet.