अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती घ्या जाणून….

ashtavinayak-ganpati

महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरांच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत. मुद्गल पुराणात तसंच इतर काही पुराणांत मंदिरांचे उल्लेख आढळतात. आठही गणपती स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे.

अष्टविनायक गणपतीची नावे पुढीलप्रमाणे…

  1. श्री मोरेश्वर – मोरगाव
  2. श्री सिध्दीविनायक – सिध्दटेक
  3. श्री बल्लाळेश्वर – पाली
  4. श्री वरदविनायक – महड
  5. श्री चिंतामणी – थेऊर
  6. श्री गिरीजात्मज – लेण्याद्री
  7. श्री विघ्नेश्वर – ओझर
  8. श्री महागणपती – रांजणगाव

१) मयूरेश्वर (मोरगाव):
मोरगावला असलेला मयूरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे. हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे. या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे. त्याचमुळे याचं नाव मयूरेश्वर असं पडलं. अष्टविनायक गणपती मधील हे सर्वात पहिले ठिकाण बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पायऱ्या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पायऱ्या चढून गेल्यावर एका दगडी चौथर्यावर मोठा आता काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे, चपटी व दगडी असे कासव आहे. या कासावापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे. अष्टविनायक गणपती मंदिराच्या गाभा-यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांची वृक्ष आहेत.

२) श्री सिध्दीविनायक – सिध्दटेक
सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे आहे. हा अष्टविनायकातील दुसरा गणपती. या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं. अनेक वर्ष हे युद्ध चाललं, पण विष्णूंना यश मिळत नव्हतं. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितलं. त्यानंतर विष्णूंनी मधु व कैटभ राक्षसांना इथं ठार केलं. म्हणूनच इथं विष्णूंचं मंदिरही पाहायला मिळतं. सिद्धिविनायकाची मूर्ती 3 फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. हा उजव्या सोंडेचा गणपती आहे.

भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. मधु व कौटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हटले जाऊ लागले. येथील दक्षिणवाहिनी असणाऱ्या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दुध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो.

अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती त्यातील हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभाऱ्यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मुंडी दुमडलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गाभाऱ्यातील मखर पितळाची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत.
स्थान : तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर

३) श्री बल्लाळेश्वर – पाली
श्री बल्लाळेश्वर (पाली) रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे. गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभाऱ्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणाऱ्या उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभाऱ्याच्या वरील बाजू घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभार्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चवऱ्या ढाळीत आहेत.
स्थान : तालुका सुधागड, जिल्हा रायगड,

४) श्री वरदविनायक – महड
रायगड जिल्ह्यातल्याच महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. हा वरदविनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जातं. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत. त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते. मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत. ऋषी गृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपतये नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले. या मंदिराबाबत एक कथा प्रसिद्ध आहे.

एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे. शिवाय दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंदादीप तेवत आहे. भक्तांना वर देणारा वरदविनायक. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू, घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत.

मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे. मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभा-यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची समाधी तेथे आहे. मंदिराच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फौंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे.
स्थान : तालुका खालापूर, जिल्हा रायगड

५) श्री चिंतामणी – थेऊर
श्री चिंतामणी (थेऊर) पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे. मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभाऱ्यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली.या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे.
स्थान : तालुका – हवेली, जिल्हा- पुणे,

६) श्री गिरीजात्मज – लेण्याद्री

श्री गिरीजात्मज (लेण्याद्री) पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरीजात्मजाचं मंदिर आहे. डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे. तसंच हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलंय. गिरीजा हे देवी पार्वतीचं नाव असून, तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे. एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे. मंदिराला जवळपास 300 पायऱ्या आहेत. या डोंगरात 18 बौद्धगुहा आहेत. त्यापैकी आठव्या गुहेत गिरीजात्मजाचं मंदिर आहे. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजात्माजाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.

या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले. गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटुरुपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व तीन नेत्र होते.गिरीजात्माजाचे मंदिरअष्टविनायक गणपतीची महत्वाची माहिती .
स्थान : पोस्ट गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा – पुणे,

७) श्री विघ्नेश्वर – ओझर
श्री विघ्नेश्वर (ओझर) अष्टविनायकातील हा सातवा गणपती. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीनं विघ्नासुर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर, विघ्नहर्ता असं नाव पडलं, अशी एक आख्यायिका आहे. सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली. विघ्नसुराचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धारण केला. मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे.

देऊळाच्या भिंतींवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभाऱ्यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पिताळ्याच्या मूर्ती आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
अष्टविनायक गणपती मधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर वसलेला असून ते गणपतीचे एक जागृत स्थान आहे.
स्थान : तालुका- जुन्नर, जिल्हा पुणे.

८) श्री महागणपती – रांजणगाव
श्री महागणपती (रांजणगाव) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे श्री महागणपतीचं मंदिर आहे. गणेशाचं सर्वांत शक्तिशाली, प्रभावशाली महागणपतीचं रूप इथं आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धीदेखील आहेत. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं. यात गणपतीला 10 सोंडी व 20 हात आहेत. या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व आहे.

अष्टविनायक गणपती मधील हे शेवटचे आणि जुने मंदिर. हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेशमूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवानाही जिंकले. सर्व देवांच्या विनंती वरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले. शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्या वेळपासून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते.

अष्टविनायकातील सर्वांत शक्तिमान असे मानल्या जाणाऱ्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे .
स्थान : तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

अष्टविनायकांच्या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे, तसेच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत. भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात.

श्री महागणपती: रांजणगाव गणपती

अष्टविनायकसह 5 मंदिरात वस्त्रसंहिता, दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे, नियमावली जारी…

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.