पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

Pune-Ganpati-Book-Publication

पुणे : पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलिस आयुक्त कार्यालयात करण्यात आले. पुणे शहरातील साडेतीन हजाराहून अधिक मंडळांची माहिती पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. शिवाय, www.puneganpati.com या वेबसाईटवर माहिती दिली जात आहे.

‘पुणे गणपती’ पुस्तक प्रकाशनावेळी ‘पोलिसकाका’चे संपादक संतोष धायबर उपस्थित होते. श्री. धायबर यांनी पुस्तकाची निर्मिती केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध असून, पुस्तक आणि वेबसाइटमुळे गणपती मंडळांची माहिती जगभर जाण्यास मदत होईल. गणपती मंडळांसह अनेकांना पुस्तक उपयोगी व संग्राह्य असणार आहे.’

संतोष धायबर म्हणाले, ‘जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने चार हजार गणपती मंडळाची माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व ‘पुणे गणपती’ या नावाने पुस्तक तयार करण्यात आले आहे. पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जात आहेत. ‘पुणे गणपती’ या पुस्तकामध्ये मंडळांची माहिती व मंडळाचे स्वतंत्र कव्हर तयार करण्याची सुविधा आहे. गणपती मंडळांचे अध्यक्ष WhatsApp ग्रुपमुळे एकत्र जोडले गेले आहेत.’

दरम्यान, पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. www.puneganpati.com या वेबसाईटवर जाऊन पुस्तक Online खरेदी करता येणार आहे.

पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.