पुणे शहरातील मानाच्या गणपतींना पहिलं विसर्जन करण्याचा मान मिळणार का?

pop-ganpati

पुणे: पुणे शहरातील अनेक मंडळांनी मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीच्या आधी आपली मिरवणूक काढून गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. मानाच्या गणपतीआधी विसर्जन करणं योग्य नसल्याने गणपती मंडळांच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण असल्याचे पहायला मिळाले होते. पुणे शहरचे पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची बैठक घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता केळकर रस्ता, टिळक रस्तावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत. मानाच्या पाच आणि तीन गणेश मंडळ विरुद्ध इतर गणेश मंडळ असा एक वेगळा वाद सध्या सुरू आहे. विसर्जन मिरवणूक लवकर निघावी ही मागणी गणेश मंडळाची आहे.

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांनंतर लगेच सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने मागे घेतला आहे. दोन्ही मंडळांच्या मिरवणुका दरवर्षीप्रमाणे संध्याकाळच्या वेळेत निघतील, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळ ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आपला निर्णय मागे घेतला आहे.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांनंतर लगेच सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने पत्रकार परिषद घेऊन घेतला होता. त्यानंतर इतर मंडळांनी आक्रमक भूमिका घेत आम्ही देखील सकाळी 7 ते 11 च्या वेळात म्हणजेच मानाच्या पाच गणपतींच्या आधी मिरवणूक सुरू करण्याची आक्रमक भूमिका मांडली. त्यामुळे पुण्यातील मिरवणुकीचा वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर आता मानाच्या गणपतींना पहिलं विसर्जन करण्याचा मान मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी अनेक बैठक घेतला मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज मोहोळ हे घेतलेल्या बैठकीत तरी तोडगा निघणार का? याकडे लक्ष आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळेत होणार बदल? एकच ढोलपथक…

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय…

गणेश चतुर्थी यंदा कोणत्या तारखेला साजरी होईल? घ्या जाणून..

विधानसभेत मोठी घोषणा! गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव; यंदा देखावा…

पुणे गणपती मंडळांच्या देणगीबाबत पुनीत बालन यांचा मोठा निर्णय…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

प्रतिक्रिया 0

No comments yet.