एकता मित्र मंडळाची उन्हाळी सहल संपन्न! घडवले अध्यात्मिक संस्कृतींचे दर्शन…

ekta-mitra-mandal-sahal

पुणेः एकता मित्र मंडळाची उन्हाळी सहल हिंदू अध्यात्मिक संस्कृतींचे दर्शन घडविण्याच्या हेतूने पुणे शहरातील ऐतिहासिक त्रिशुंड गणपती मंदिर, नागेश्वर मंदिर व इस्कॉन मंदिर येथे संपन्न झाली.

एकता मित्र मंडळाच्या वतीने २०२१ सालापासून उन्हाळी सुट्टीमध्ये बाल – लहान, किशोरवयीन व युवा मुलांसाठी उन्हाळी सहल उपक्रमाची सुरुवात झाली. यामुळे मुलांमध्ये पर्यावरण, निसर्ग, उद्याने, संग्रहालय, टेकड्या, ग्रामीण राहणीमान, धार्मिक स्थळे, आसपासचा ऐतिहासिक व भौगोलिक परिसर यांची सखोल माहिती करून घेणे यांविषयी मोठ्या प्रमाणात आवड निर्माण झाली आहे.

यंदाच्या वर्षीही एकता मित्र मंडळाची सहल महिलाध्यक्षा दिपाताई नाईक यांच्या पुढाकारातून व पदाधिकारी मजीद शेख यांच्या मदतीने रविवार, दि. १८ मे २०२५ रोजी आपल्या हिंदू अध्यात्मिक संस्कृतींचे दर्शन घडविण्याच्या हेतूने सोमवार पेठ येथील शिल्पकलेने नटलेले सर्वोत्तम मंदिरांपैकी एक व २७५ वर्षांहून वर्षांहून जुने असणारे त्रिशुंड गणपती मंदिर, १४ व्या शतकात बांधण्यात आलेले ऐतिहासिक नागेश्वर मंदिर व कात्रज येथील पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर म्हणून ओळख असणारे इस्कॉन मंदिर येथे आयोजित करण्यात आली. यावेळी सर्व मुलांना तिन्ही मंदिरांमधील त्रिशुंड्या गणपती, नागेश्वर व राधा वृंदावनचंद्र यासोबत व्यंकटेश बालाजी दर्शन घेत मंदिरांविषयीचे महत्व, संस्कृती व इतिहास विस्तारितपणे सांगण्यात आला.

यावेळी त्रिशुंड गणपती मंडळाचे सचिन लांडगे यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांच्या ज्ञानपूर्ण वाणीतून मुलांसमोर मंदिराच्या इतिहासाचा संपूर्ण उलगडा केला. त्याचप्रमाणे त्रिशुंड मंडळाच्या वतीने सर्वांसाठी चहा पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच एकता मंडळाच्या दिपाताई नाईक व मजीद शेख यांचा यथोचित सन्मान केला.

एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)

Video: एकता मित्र मंडळ…

एकता मित्र मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीला गोसेवा अन्नदान!

एकता मित्र मंडळाच्या वतीने मुलांना खेळांची मेजवानी !

अरण्येश्वर एकता मित्र मंडळाने सुरू केला पक्षांची तहान भागवण्याचा जागरूक उपक्रम…

प्रतिक्रिया 0

No comments yet.