पुणे गणपती मंडळांच्या देणगीबाबत पुनीत बालन यांचा मोठा निर्णय…

punit-balan

पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक आणि गौरवशाली गणेशोत्सव केवळ पुणेकरांचा नाही, तर अवघ्या देशाचे आणि जगाचे आकर्षण ठरला आहे. मात्र या पारंपरिक सणाचे रूपांतर अलीकडच्या काळात स्पीकर्सच्या भिंती, डीजे आणि अश्लील गाण्यांच्या गोंगाटात होत असल्याने, याविरोधात समाजातील काही सजग घटकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

पुणे गणेशोत्सवा दरम्यान यंदा पुनीत बालन यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील जे गणपती मंडळ डीजे लावतील त्यांना देणगी न देण्याचा निर्णय पुनीत बालन यांनी घेतला आहे. पुनीत बालन यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. त्यामुळे यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव होणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत.

दहा दिवसाच्या या गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी म्हणजेच मिरवणुकीला सर्वात जास्त डीजेचा वापर केला जातो. देणगी दिलेल्या या सगळ्या मंडळांवर आम्ही काटेकोरपणे नजर ठेवणार आहोत आणि ज्यांनी देणगी घेऊनही डीजे वाजवला तर त्यांना यापुढे कधीही देणगी न देण्याचा निर्णय घेणार आहोत, असे पुनीत बालन यांनी सांगितले आहे. सोबतच काही संस्थांनी देखील या निर्णयाचा स्वागत केले असून, त्या संस्थांना देखील सोबत घेऊन पोलीस आणि प्रशासनाची चर्चा करून यावर पुन्हा एकदा निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. पुणे गणेशोत्सव हा परंपरेचा आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो त्यामुळे याला गालबोट लागू नये हाच या मागचा हेतू असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

प्रतिक्रिया 0

No comments yet.