श्री गणेश पूजा कशी करावी…

Srimant-Dagadushet-Halwai Ganpati

आचमन : ॐ केशवाय नम:। ॐ नारायणाय नम:। ॐ माधवाय नम:। या नावांनी दोनदा आचमने करावी. ॐ गोविंदाय नम:। या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा.
आसनशुध्दी : भूमीला स्पर्श करून ही शुध्दी करावी लागते.
भूतोत्सारण : हातात अक्षता घेऊन दक्षिणेस फेकाव्या.
षडंगन्यास : शरीरशुध्यर्थ मांडी घालून दोन्ही हातांनी न्यास करावे.
कलश पूजा : पाणी भरलेल्या कलशाला गंध-अक्षता लावलेले फूल चिकटवावे. भारतीय संस्कतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक. शुभकार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे. चारही वेदांचे यात वास्तव्य मानले असून आपल्या सहा अंगांसह सर्व वेद या कलशात आहेत.
शंखपूजा : शंखाला स्नान घालून गंध, पुष्प घालावे. शंखमुद्रा दाखवून नमस्कार करावा.
घंटा-पूजा : घंटानादं कुर्यात्-घंटा वाजवावी. घंटेला गंध,अक्षता, फूल, व हळदकुंकू वाहावे.
दीपपूजा : समईला फुलाने गंध, फूल व हळदकुंकू लावावे.
प्रोक्षण : दुर्वांनी पूजा साहित्यावर व स्वत:वर पाणी शिंपडावे.
प्राणप्रतिष्ठा : दोन दुर्वांकुरांनी गणपतीला स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी. ताम्हनात एक पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे. नंतर दुर्वांकुरांने गणपतीच्या पायाला स्पर्श करावा.
अभिषेक : गणपतीवर फुलाने किंवा दुर्वांकुराने पाणी शिंपडावे आणि अभिषेक करावा.

गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष…

गणपती बाप्पाचे अध्यात्मिक महत्व…

श्री गणपती स्तोत्र: भक्ती आणि शांतीचा मंत्र आणि महत्व…

अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती घ्या जाणून….

गणपती बाप्पा बद्दल माहिती! जन्मकथा, बारा नावे, आवडत्या गोष्टी पाहा…

धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

घरात देवाला नैवेद्य अर्पण करतानाचे नियम…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

गणपती बाप्पाचे 5 शक्तिशाली मंत्र, दारिद्र जाईल पळून…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

प्रतिक्रिया 0

No comments yet.