गणपती बाप्पाला दुर्वाच का वाहतात? घ्या जाणून…

ganpati-bappa-and-durva

गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पाच्या आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात. गणपती बाप्पाची एक गोष्ट आवडते ती म्हणजे दुर्वा. दुर्वांशिवाय बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते. पण, गणरायाला दुर्वा का वाहतात? याबाबत माहिती घ्या जाणून…

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. अनलासूर नावाचा एक राक्षस होता. तो देवांना आणि ऋषींना प्रचंड त्रास द्यायचा. सर्वजण त्याच्या त्रासाला कंटाळले होते. अखेर सर्व देव आणि ऋषी गणपती बाप्पाकडे गेले. त्यांनी गणपतीसमोर आपली व्यथा मांडली. त्यावेळी गणपती खूप लहान होते पण त्यांची कीर्ती मोठी होती. बाप्पाने थेट अनलासुराशी युद्ध केले. तेव्हा अनलासुरानं गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला. मग मात्र, गणरायानं रुद्ररूप धारण करून अनलासुरावर मात केली. अनलासुराला जिवंत गिळले.

‎अनलासुराला गिळल्यानंतर बाप्पाच्या शरिराचा खूप दाह झाला. ऋषींनी अनेक उपचार केले पण, दाह काही शांत होत नव्हता. अखेर ऋषींनी बाप्पाच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या तेव्हा शरीर थंड झाले. त्यानंतर बाप्पानं सर्व देवांना आणि ऋषींना आशीर्वाद दिला की, जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हापासूनच गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली. गणपतीला 21 दुर्वांची जुडी वाहिली जाते. गावखेड्यांमध्ये हरळ नावाचं गवत आढळते. हे हरळ म्हणजेच दुर्वा असतात.

गणपती बाप्पा घरी आणतो तेव्हा झाकून का आणतो…

गणपती बाप्पाला मोदक प्रिय का…

श्री गणेश पूजा कशी करावी…

गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष…

गणपती बाप्पाचे अध्यात्मिक महत्व…

श्री गणपती स्तोत्र: भक्ती आणि शांतीचा मंत्र आणि महत्व…

अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती घ्या जाणून….

गणपती बाप्पा बद्दल माहिती! जन्मकथा, बारा नावे, आवडत्या गोष्टी पाहा…

धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

घरात देवाला नैवेद्य अर्पण करतानाचे नियम…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

गणपती बाप्पाचे 5 शक्तिशाली मंत्र, दारिद्र जाईल पळून…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.