गणपती बाप्पाला मोदक प्रिय का…

गणपतीला देवांनी अथक परिश्रम करून अमृताचा मोदक तयार केला. तो घेऊन ते शंकराकडे आले. पार्वतीच्या हातात मोदक देऊन परत गेले. ’स्कंद’ व ’गणेश’ मोदक मिळावा म्हणून पार्वतीजवळ येऊन बसले.

पार्वती म्हणाली, ’हा महाबुध्दी मोदक आहे. याचा वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होतं. जो हा मोदक खाईल, तो सर्व शास्त्रांत प्रवीण होईल व शस्त्रास्त्रविद्येतही निपुण होईल. हे ऐकल्यावर स्कंद व गणेश हे दोघेही ‘मला मोदक हवा’, असा हट्ट करू लागले. तेव्हा पार्वतीने एक युक्ती शोधली. ती आपल्या पुत्रांना म्हणाली, ‘तुम्ही दोघंही पृथ्वीप्रदक्षिणेला जा. जो आधी करून येईल, त्याला मी मोदक देईन.’

स्कंद लगेच पृथ्वीप्रदक्षिणेला निघाला; परंतू गणपती मात्र तिथेच थांबला. त्यानं एका शिलाखंडावर शंकर-पार्वतींना बसवीले. त्या दोघांची यथासांग पूजा केली. त्या दोघांनाच एक पूर्ण प्रदक्षिणा घातली व तो शंकर-पार्वतीपुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मधुर वाणीने म्हणाला, ‘आई-वडीलांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीप्रदक्षिणा. सर्व तीर्थात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार. सर्व यज्ञयागादी व्रतं व साधना यांचं पुण्य आई-वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागांएवढंही होऊ शकत नाही.’

शंकर-पार्वतीला गणपतीच्या कुशाग्र बुध्दीचे कौतुक वाटले. पार्वतीने गणपतीला आनंदानं तो दिव्य मोदक दिला. लहानपणी गजाननाने दाखवलेली हुषारी, ते बुध्दीची देवता होणार आहेत हे दाखवून गेली.

श्री गणेश पूजा कशी करावी…

गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष…

गणपती बाप्पाचे अध्यात्मिक महत्व…

श्री गणपती स्तोत्र: भक्ती आणि शांतीचा मंत्र आणि महत्व…

अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती घ्या जाणून….

गणपती बाप्पा बद्दल माहिती! जन्मकथा, बारा नावे, आवडत्या गोष्टी पाहा…

धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

घरात देवाला नैवेद्य अर्पण करतानाचे नियम…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

गणपती बाप्पाचे 5 शक्तिशाली मंत्र, दारिद्र जाईल पळून…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

प्रतिक्रिया 0

No comments yet.