गणपती बाप्पा घरी आणतो तेव्हा झाकून का आणतो…

गणपती बाप्पा जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा तो झाकून आणतो. मात्र, ही प्रथा का आहे याचा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? नसेल तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. धार्मिक परंपरेनुसार, मूर्तीचा पुढील भाग सगुण तत्त्व म्हणजेच भौतिक स्वरुपाचा असतो. आणि मागील भाग निर्गुण तत्त्व म्हणजेच अभौतिक तत्व उत्सर्जित करतो.

गणपती बाप्पाची मूर्ती झाकल्याने हे दोन्ही तत्त्व संतुलित राहतात अशी मान्यता आहे. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर मूर्तीमधील दैवत्त्व पूर्णत्वास येते असे म्हटले जाते. शिवाय, बाहेरील धूळ, वारा, पाऊस अशा घटकांपासून मूर्तीचं संरक्षण करता येते. मुख्य कारण म्हणजे, प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर मूर्तीला नकारात्मक ऊर्जेपासून बचवा करण्यासाठी मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे.

शास्त्रानुसार, तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाला गणपतीची स्थापना करणार असाल तर, शाडूची मूर्ती घरात आणा. तसेच, गणरायाची सोंड डाव्या बाजूला असावी. तसेच, मूर्ती विराजमान अवस्थेत असावी. तसेच, गणपतीच्या बरोबर उंदीरमामा देखील असावा. तसेच, गणपतीची मूर्ती स्थापन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की, मूर्तीची जागा जागेवरुन हलवू नका. एकदा मूर्ती विराजमान केल्यानंतर थेट विसर्जनाच्या दिवशीच तुम्ही मूर्ती हलवू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असून, पुणे गणपती कोणताही दावा करत नाही.)

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

गणपती बाप्पाला मोदक प्रिय का…

श्री गणेश पूजा कशी करावी…

गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष…

गणपती बाप्पाचे अध्यात्मिक महत्व…

श्री गणपती स्तोत्र: भक्ती आणि शांतीचा मंत्र आणि महत्व…

अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती घ्या जाणून….

गणपती बाप्पा बद्दल माहिती! जन्मकथा, बारा नावे, आवडत्या गोष्टी पाहा…

धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

घरात देवाला नैवेद्य अर्पण करतानाचे नियम…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

गणपती बाप्पाचे 5 शक्तिशाली मंत्र, दारिद्र जाईल पळून…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.