अनंत चतुर्दशी! जाणून घ्या शुभ मुहू्र्त, उपाय आणि विसर्जन पद्धत…

naivedya

पुणे : गणेशोत्सव हा उत्सव 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. या वर्षी अनंत चतुर्दशी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. विसर्जन हा या उत्सवाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो.

अनंत चतुर्दशीची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3.14 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1.41 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार अनंत चतुर्दशीचा सण यावेळी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे.

Buy Online : पुणे गणपती (२०२५-२६) पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध…

विसर्जन कसे केले जाते
अनंत चतुर्दशी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी बाप्पाची पूजा झाल्यानंतर भाविक भक्तिभावाने गणपती बाप्पाच्या मूर्तीचे नदी, तलाव किंवा कोणत्याही जलाशयात विसर्जन करतात. विसर्जन हा एक फक्त धार्मिक विधी नसून सांस्कृतिक श्रद्धा देखील आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने बाप्पाचे भक्तांवर आशीर्वाद राहतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.

विसर्जनाची पूजा पद्धत

  • विसर्जनापूर्वी बाप्पाची आरती करुन उत्तर पूजा करुन घ्यावी.
  • त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्या नंतर बाप्पाच्या गम गणपतये नम: या मंत्रांचा जप करा.
  • नंतर तांदूळ, फुले, धूप आणि पैसे या गोष्टी बाप्पाला अर्पण करा.
  • वरील सर्व गोष्टी झाल्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि झालेल्या चुकीबद्दल माफी मागा. त्यानंतर विसर्जन करा.

विसर्जनाच्या वेळी करा हे उपाय
लाल फुले : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या काळात बाप्पाला लाल फुले अर्पण केल्याने मानसिक शांती देखील मिळते.

नारळाचा उपाय : बाप्पाच्या विसर्जनापू्र्वी चार नारळ एकत्र करुन त्याचा हार तयार करुन तो अर्पण करा म्हणजे तुमची बिघडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील.

कच्चा रेशमी धागा : गणपती विसर्जनाच्या दिवशी कच्च्या रेशमी धाग्याच्या सात गाठी बांधा आणि त्यानंतर जय गणेश कटो कलेश मंत्राचा जप करुन तो धागा तु्मच्याजवळ ठेवा. ज्यावेळी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाल त्यावेळी तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

(टीपः संबंधित लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

गणपती बाप्पाला दुर्वाच का वाहतात? घ्या जाणून…

गणपती बाप्पा घरी आणतो तेव्हा झाकून का आणतो…

गणपती बाप्पाला मोदक प्रिय का…

श्री गणेश पूजा कशी करावी…

गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष…

गणपती बाप्पाचे अध्यात्मिक महत्व…

श्री गणपती स्तोत्र: भक्ती आणि शांतीचा मंत्र आणि महत्व…

अष्टविनायक गणपतीची नावे आणि माहिती घ्या जाणून….

गणपती बाप्पा बद्दल माहिती! जन्मकथा, बारा नावे, आवडत्या गोष्टी पाहा…

धार्मिक विधी करण्यासाठी गुरुजी…

घरात देवाला नैवेद्य अर्पण करतानाचे नियम…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

गणपती बाप्पाचे 5 शक्तिशाली मंत्र, दारिद्र जाईल पळून…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.