एकता मित्र मंडळातर्फे व्याख्यानाचे यशस्वी आयोजन…

ekta-mitra-mandal-ahilyadevi

पुणेः गोरगरीब जनतेस देऊन न्याय, न्यायाची देवता झालीस तू, स्त्री उद्धाराचा घेऊन ध्यास, स्त्री शक्ती झालीस तू… पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती व त्रिशताब्दी वर्षानिमित्त एकता मित्र मंडळात व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

एकता मित्र मंडळामध्ये तत्त्वज्ञानी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व त्रिशताब्दी वर्षानिमित्त गुरुवारी (ता. २९) त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सहकारनगर भागातील व्याख्यात्या उत्तराताई सुमंत यांनी त्यांच्या मधुर व ज्ञानपूर्ण वाणीतून अहिल्यादेवींचे जीवनचरित्र व इतिहासाचा उलगडा करत विस्तृतरित्या माहिती सांगितली.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर वस्ती संयोजक शिरीषजी आफळे व नियोजन मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले, सल्लागार अविनाश खंडागळे, जयेश ढमाले, शुभम बाणखेले, गणेश खाडे, अथर्व तिवाटणे, संकेत मिरघे, हर्षद खंडागळे, साई भोसले यांनी केले. यावेळी पद्मावती नगराचे अश्विनी देऊस्कर, वर्षा आपटे, उत्तरा सुमंत, अमृता धोमकर, मकरंद पारखी असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी श्रींची आरती करून उपस्थित सर्व मान्यवरांचा मंडळातर्फे आभार व्यक्त करत यथोचित सन्मान करण्यात आला.

एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर. सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार अभिवादन करत मानाचा मुजरा करण्यात आला.

Video: एकता मित्र मंडळ…

एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)

एकता मित्र मंडळाची उन्हाळी सहल संपन्न! घडवले अध्यात्मिक संस्कृतींचे दर्शन…

एकता मित्र मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीला गोसेवा अन्नदान!

अरण्येश्वर एकता मित्र मंडळाने सुरू केला पक्षांची तहान भागवण्याचा जागरूक उपक्रम…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

प्रतिक्रिया 0

No comments yet.