गणेश चतुर्थी यंदा कोणत्या तारखेला साजरी होईल? घ्या जाणून..

pop-ganpati

पुणे: पुणे शहरासह जगभर गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुणे शहरासह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. यात काही दिवसातच गणेश मंडळात सजावटीचे लगबग सुरु आहे. गणेशभक्त गणेशाची भक्तीभावाने पूजा करण्यास उत्सुक आहेत. यावर्षी गणपती बाप्पा नेमके कोणत्या तारखेला विराजमान होणार आहेत? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.

गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. त्यानुसार २०२५ मध्ये गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी (बुधवार) साजरी केली जाईल. म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणपती बाप्पा ११ दिवस आधीच विराजमान होतील. या दिवशी गणेशाची पूजा केली जाईल; तर गौरी-गणपती विसर्जन हे २ सप्टेंबर २०२५ रोजी होईल. तर अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर ११ दिवसांनी गणपती बाप्पाचे विसर्जन होईल.

यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होईल. या दिवशी श्रीगणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०५ ते दुपारी १.४० पर्यंत असेल. या दिवशी निषिद्ध चंद्रदर्शन वेळ सकाळी ०९.२८ ते रात्री ०८.५७ पर्यंत असेल.

गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी, समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सव सुरू होतो. हा उत्सव १० दिवस चालतो. या उत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्यास शुभ फल प्राप्त होते.

गणपती बाप्पाच्या मुर्ती लवकरच Online विक्रीसाठी…

गणपती बाप्पाला मोदक प्रिय का…

गणपती बाप्पाचे अध्यात्मिक महत्व…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

श्री गणेश पूजा कशी करावी…

पुणे गणपती मंडळांच्या देणगीबाबत पुनीत बालन यांचा मोठा निर्णय…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

 

प्रतिक्रिया 0

No comments yet.