जादुगार संजय रघुवीर यांचे गणपती मंडळासाठी खास शो!

Jadugar-Sanjay-Raghuveer

पुणे: पुणे शहरातील गणपती महोत्सव हा जगप्रसिद्ध असून, गणपती मंडळ दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. पुणे शहरातील गणपती मंडळासाठी प्रसिद्ध जादुगार संजय रघुवीर हे विशेष शो सादर करणार आहेत. गणपती मंडळांनी जादूच्या विशेष शो साठी संपर्क साधण्याचे आवाहन जादुगार संजय रघुवीर यांनी केले आहे.

प्रसिद्ध जादुगार संजय रघुवीर यांनी पुणे शहर, महाराष्ट्र, देश आणि विदेशामध्ये अनेक शो सादर केले आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी असते. www.puneganpati.com या वेबसाईटच्या माध्यमातून ते गणपती मंडळासाठी खास शो सादर करणार आहेत. गणपती मंडळांनी कार्यक्रमासाठी 90210 18050 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संजय रघुवीर हे जागतिक किर्तीचे जादुगार रघुवीर भिकाजी भोपळे यांचे पुत्र आहेत. जादुगार रघुवीर भिकाजी भोपळे यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला आहे.

दरम्यान, रघुवीर भिकाजी भोपळे हे जागतिक किर्तीचे जादुगार होते. त्यांनी ७ हजार २३ प्रयोग केले. जादू हा तंत्रमंत्र नाही तर ती हातचलाखी आहे, हे ठसवताना त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून जनजागरण केले. ३६५ दिवसांत २०० प्रयोग व तेही हाऊसफुल, असे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. अनेक गावांतील मंदिरे, शाळा, हॉल, तालमीच्या बांधकामांसाठी निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले कार्यक्रम फुकट दिले. निखळ करमणूक हे सूत्र ठेवून रघुवीरांनी अनेक वर्षे आबालवृद्धांवर अक्षरशः जादू केली. अशा या जगविख्यात जादुगाराचे २० ऑगस्ट १९८४ रोजी निधन झाले.

पुणे गणपती मंडळांच्या देणगीबाबत पुनीत बालन यांचा मोठा निर्णय…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

प्रतिक्रिया 0

No comments yet.