गणपतीच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डा खोदला तर 15 हजारांचा दंड होणार…

pop-ganpati

मुंबई : गणेश मंडळांनी रस्त्यावर जर मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावली नुसार 15 हजार रुपये दंड पालिकेकडून आकारण्यात येणार आहे. मात्र या पूर्वी हा दंड फक्त 2 हजार रुपये होता. म्हणजेच यंदा हा दंड तब्बल साडेसात पट वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही कारवाई ‘अन्यायकारक’ असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दुसरीकडे या या निर्णयाचा विरोध लक्ष्यात घेता जुन्या नियमानुसारच दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन निर्णयावर पुन्हा विचार करू, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या नव्या नियमानुसार खड्याला 15 हजार दंड आकारण्यात येणार असल्याने मुंबईतील मंडळामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. हि नाराजी दूर करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे. या संदर्भात महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन या निर्णयावर विचार करू, असेही आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे. तसेच येत्या 10 दिवसात मुंबईतील आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन देखील त्यांनी दिलं.

‘श्रीगणेशोत्सव’ महाराष्ट्र शासनाने यावर्षापासून “महाराष्ट्राचा राज्य उत्सव” म्हणून घोषित केला आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव उत्साहाने व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेश चतुर्थी यंदा कोणत्या तारखेला साजरी होईल? घ्या जाणून..

गणपती बाप्पाच्या मुर्ती लवकरच Online विक्रीसाठी…

गणपती बाप्पाला मोदक प्रिय का…

गणपती बाप्पाचे अध्यात्मिक महत्व…

गणपती बाप्पाची आरती आणि अर्थ

श्री गणेश पूजा कशी करावी…

पुणे गणपती मंडळांच्या देणगीबाबत पुनीत बालन यांचा मोठा निर्णय…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

प्रतिक्रिया 0

No comments yet.