बाप्पाच्या कार्यकर्त्यांकडून ५१ किलोचा महानैवद्य; विद्यार्थ्यांमध्ये प्रसादाचे वाटप…

ekta-mitra-mandal

पुणे: अरणेश्वर येथील गणपती एकता मित्र मंडळातर्फे चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या ५१ कार्यकर्त्यांकडून बाप्पाला महाभोग म्हणून ५१ किलोचा महानैवद्य प्रसाद म्हणून कात्रज येथील सुमती बालवन शाळेतील उद्याचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आले.

संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाच्या ५१ कार्यकर्त्यांकडून बाप्पाला महाभोग म्हणून ५१ किलोचा महानैवद्य गुजर-निंबाळकर वाडी, कात्रज, पुणे येथील राधाबाई हर्डीकर प्राणिजात मंगल संस्था संचलित सुमती बालवन या शाळेतील विद्यार्थ्यांना एकता मंडळाचे कार्यक्षम पदाधिकारी गौरव शिर्के यांच्या पुढाकारातून आणि महेश लोभे, अथर्व तिवाटणे, सीतांशू साळेकर यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन मुलांशी गप्पागोष्टी करत प्रसाद रुपात वाटप करण्यात आले.

सुमती बालवन शाळेला समाजाची साथ पाहिजे. निराधार व दुर्बल घटकातील मुलांना मूलभूत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी ही शाळा आहे. प्रत्येक पालक आपल्या पाल्याला उच्च व कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी धडपडत आहे. पण ज्या मुलांना आई-वडील व अन्य नातेवाईक नाहीत अशा निराधार मुलांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल, याचाही समाजाने विचार करायला हवा आणि एकता मित्र मंडळाने याचा विचार करत भविष्यात संस्थेतसाठी जे काय करता येईल त्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

काय शिकविले जाते या शाळेमध्ये…
शेती आणि पशुसंवर्धन (सेंद्रिय, नावीन्यपूर्ण शेती व पशुपालन प्रशिक्षण) शेतीला प्रतिष्ठा आणि समृद्धी परत आणण्यासाठी संस्थेकडून शेती आणि पशुसंवर्धनचे प्रशिक्षण देण्यात येते. अन्न, आरोग्य आणि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी आणि थ्रीडी प्रिंटिंग डिझाइनिंग आणि बिल्डिंग संरचनेला लागणारे वेल्डिंग, फॅब्रिकेशन, दगडी बांधकाम संरचना, बांबूचे काम, मेटल कटिंग इ., रक्ताच्या पॅरामीटर्सचा अभ्यास करणे, संसर्गजन्य आजार व विविध रोग आणि लैंगिक शिक्षण, वीज उपकरणांचे शिक्षण, चित्रपट निर्मिती, ग्राफिक डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, सार्वजनिक ठिकाणी बोलणे आणि सुसंवाद, कला, आवाज आणि ग्रुप थेरपी, ड्रोनचा वापर, खेळाच्या माध्यमातून विज्ञान प्रयोग नावीन्यपूर्ण, इको फ्रेंडली उत्पादने योगासने व प्राणायाम शिक्षण दिले जाते.

एकता मित्र मंडळातर्फे व्याख्यानाचे यशस्वी आयोजन…

Video: एकता मित्र मंडळ…

एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)

एकता मित्र मंडळाची उन्हाळी सहल संपन्न! घडवले अध्यात्मिक संस्कृतींचे दर्शन…

एकता मित्र मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीला गोसेवा अन्नदान!

अरण्येश्वर एकता मित्र मंडळाने सुरू केला पक्षांची तहान भागवण्याचा जागरूक उपक्रम…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

प्रतिक्रिया 0

No comments yet.