पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळेत होणार बदल? एकच ढोलपथक…

पुणे: पुण्यातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाआधीच इतर मंडळांना मिरवणुकीत सहभागी होऊ द्यावे, अशी मागणी अनेक मंडळांनी केली आहे. याशिवाय, प्रत्येक गणेश मंडळासोबत स्वतंत्र ढोल-ताशा पथक न देता एकाच पथकाचा वापर करावा, अशी सूचनाही समोर आली आहे.

पुणे शहरातील गणपती मंडळाची सकाळी सात वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मानाचे पाच गणपतीही सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पुण्यातील गणेश मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकींना होणारा उशीर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन आणि शहरातील इतर शेकडो गणेश मंडळांच्या गणपतीचं विसर्जन होण्यासाठी संध्याकाळ होते. त्यामुळे त्यांची वाद्य ढोल पथक मिरवणुका करण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंत मिरवणूक लांबते. त्यामुळे इतर गणेश मंडळांनी एकत्र येत पुण्यात बैठक घेतली. यात पुण्यातील पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका या सकाळी सात वाजता व्हाव्यात, जर त्या होणार नसतील तर इतर मंडळ सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूक काढायला तयार आहेत, असे या बैठकीत मांडण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे कलादालनात झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केले आहे. मानाच्या गणपतींमुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचे या मंडळांचे म्हणणे होते. त्यामुळे विसर्जनाच्या वेळापत्रकात आणि मिरवणूक रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या बैठकीला 70 पेक्षा अधिक मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीला लागणारा वेळ पाहता पाच मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळांनी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे.

पुण्यातील लक्ष्मी रसत्यावरील विसर्जन मिरवणूकीत 300 पेक्षा अधिक गणेश मंडंळं सहभागी होतात. मात्र, पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन होईपर्यंत संध्याकाळ होते. पुण्याची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरु होते. मात्र, यावेळी अनेक मंगळांनी पाच मानाच्या गणपतींच्या आधी सात वाजल्यापासुन मिरवणूकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर प्रत्येक मंडळाने एकच ढोल ताशा पथक वापरावे याबद्दल देखील या बैठकीत चर्चा झाली.पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केले आहे.

दरम्यान, यंदा प्रत्येक मंडळासाठी एकच ढोल-ताशा पथक असावे, अशी सूचना बैठकीत मांडण्यात आली. यामुळे विसर्जन मिरवणूक अधिक वेगाने पुढे सरकू शकते आणि तांत्रिक अडचणीही कमी होतील, असेही मत मांडले गेले. लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक वर्षी 300 हून अधिक गणेश मंडळं सहभागी होतात. त्यामुळे मिरवणुकीचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरते. वेळेचं बंधन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वेळेत विसर्जन पार पाडणे आवश्यक असते. सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंतिम रूपरेषा लवकरच पुणे पोलिस प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीत मांडली जाणार आहे. त्या अनुषंगानेच विसर्जनाच्या वेळा, मंडळांचा क्रम आणि ढोल-ताशा पथकांचा नियोजन स्पष्ट होणार आहे. गणेश विसर्जन 2025 मध्ये बदल पाहायला मिळणार आहे.

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय…

गणेश चतुर्थी यंदा कोणत्या तारखेला साजरी होईल? घ्या जाणून..

विधानसभेत मोठी घोषणा! गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव; यंदा देखावा…

पुणे गणपती मंडळांच्या देणगीबाबत पुनीत बालन यांचा मोठा निर्णय…

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे गणपती डायरी २०२५-२६ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

 

प्रतिक्रिया 0

No comments yet.