श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Srimant-Dagadushet-Halwai Ganpati

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले.

दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.

भक्तांचे लाडके आराध्य-दैवत!
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.

मंदिराच्या वेळा (दररोज)
स. ५ ते रा. १०:३० (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
मंदिराची वेळ (मंगळवार)– स. ५ ते रा. ११
सुप्रभातम आरती– स. ७.३० ते ७.४५
नैवेद्य आरती– दु. १.३० ते १.४५
मध्यान्ह आरती– दु. ३.०० ते ३.१५
महामंगल आरती– रा. ८.०० ते ९.००
शेजारती– रा. १०.३० ते १०.४५

संस्थापक विश्वस्त :
अध्यक्ष: श्री. तात्यासाहेब गोडसे
उपाध्यक्ष : श्री. मामासाहेब रासने
कोषाध्यक्ष : श्री. शंकरराव सूर्यवंशी, श्री. काशीनाथ रासने

विद्यमान विश्वस्त :

अध्यक्ष : श्री. सुनील रासने
उपाध्यक्ष : माणिकराव चव्हाण, श्री. रामचंद्र परांजपे
कोषाध्यक्ष : श्री. महेश सूर्यवंशी
सचिव : श्री. हेमंत रासने
सहसचिव : श्री. मुरलीधर लोंढे, श्री. अमोल केदारी
उत्सव प्रमुख : श्री. अक्षय गोडसे
विश्वस्त : श्री. विजयकुमार वांबुरे, श्री. उत्तमराव गावडे

संपर्क :
+91 20 24496464
contact.dhgt@gmail.com
www.dagdushethganpati.com

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टला साडेचार कोटी रुपयांची जमीन दान…

प्रतिक्रिया 0

No comments yet.