मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी गणपती

tambdi-jogeshwari-ganpati

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. कसबा गणपतीप्रमाणे या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जात असे; पण २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. पुण्यातील मानाच्या गणपतींचे आणि इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही. पण, तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

प्रतिक्रिया 0

No comments yet.