मानाचा पाचवा गणपती : केसरी वाडा गणपती

kerari-ganpati

पुण्यातला शेवटचा व पाचवा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो, तो म्हणजे केसरी वाडा गणपती. १८९४ पासून केसरी या लोकमान्य टिळक यांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला. त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने या ठिकाणी होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक देखील पालखीतूनच निघते.

मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते. मात्र, केसरी वाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.

प्रतिक्रिया 0

No comments yet.