मानाचा चौथा गणपती : तुळशीबाग गणपती

tulshibag-ganpati

पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबागेच्या मध्यभागी याची प्रतिष्ठापना होते. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे.

ज्येष्ठ मूर्तिकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे. आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो. पुण्यातील हलत्या देखाव्यांची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळाने केली होती.

प्रतिक्रिया 0

No comments yet.