Pune Ganpati : मानाच्या 5 गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ जाहीर…

kasba-ganpati

पुणे : पुण्यातील पाच मानाच्या गणपतींच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक गणपतीच्या आगमनासाठी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार मिरवणूक आणि विधी पार पडतील. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात भक्तांसाठी धार्मिक विधी, प्रभात बँड आणि ढोल-ताशा वादन यांचे आयोजन करण्यात आले आहे.

मानाचा पहिला गणपती: कसबा गणपती
मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती याची आगमन मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू होईल. या मिरवणुकीत प्रभात बँड पथकासोबत ढोल-ताशा पथकही वादन करेल. त्यानंतर, सकाळी 11:37 वाजता, गणपतीची प्राणप्रतिष्ठा आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते संपन्न होईल.

मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी गणपती
आगमन मिरवणूक सकाळी 10 वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरून निघणार आहे. दुपारी 12:11 वाजता सनई-चौघड्याच्या साथीत प्राणप्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होईल. यंदा साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिल्या प्रतिकृतीसाठी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती मंडळाकडून साकारण्यात आली आहे.

मानाचा तिसरा गणपती : गुरुजी तालीम गणपती
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे यंदाचे 139 वे वर्षे असून बापाच्या आगमनाची मिरवणूक आकर्षक फुलांच्या रथातून बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल. प्रतिष्ठापना दुपारी 2:35 वाजता संपन्न होणार आहे.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ :
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षे असून बुधवारी दुपारी 12.15 वाजता आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. तुळशीबाग मंडळाकडून यंदा मथुरेचे वृंदावन साकारले आहे.

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा :
सकाळी 9 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुरुवात होईल. सकाळी 10 ते 11 यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी 11 वाजता बाप्पाच्या महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी 7 वाजता सुरू होईल. या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा आणि प्रभात बँड वादन करतील, ज्यामुळे भक्तांना उत्सवाचा रंग आणि भक्तिभाव अनुभवायला मिळेल. मिरवणूक रस्त्यावरून मार्गक्रमण करत मंदिरात पोहोचेल, जिथे गणपतीची प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. श्रींची प्राणप्रतिष्ठा बुधवारी सकाळी 11.11 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात धार्मिक विधी, आरती आणि भक्तिमय कार्यक्रमांचा समावेश असेल, ज्यामुळे भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव घडेल. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भक्तांच्या सोयीसाठी आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले आहे.

पुणे गणेशोत्सवा विषयी…

पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत झाला मोठा निर्णय…

पुणे मेट्रोने गणेशोत्सवात नागरिकांसाठी घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरातील मानाच्या गणपतींना पहिलं विसर्जन करण्याचा मान मिळणार का?

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळेत होणार बदल? एकच ढोलपथक…

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय…

गणेश चतुर्थी यंदा कोणत्या तारखेला साजरी होईल? घ्या जाणून..

पुणे शहरातील गणपती मंडळांचे ‘आमचे मंडळ-आमचे अध्यक्ष’ पुस्तक…

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

वज्रदेही मंडळ ट्रस्ट

प्रतिक्रिया 0

No comments yet.